मुंबई शहर व उपनगरांतील प्रदूषणाने अत्यंत घातक पातळी गाठली आहे. वाढते बांधकाम प्रकल्प, असंख्य वाहने, उद्योग-धंद्यांपासून निर्माण होणाऱया प्रदूषणाने मुंबईकरांच्या शरिरात श्वसनाद्वारे पाचहून अधिक सिगारेटच्या धुराएवढा घातक धूर जमा होत आहे. हा धूर फुप्फुसावर आघात करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
बेकऱ्या, कारखाने, भट्टय़ांमधूनही मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण बाहेर पडत आहे. पाच सिगारेट ओढल्यानंतर जेवढा धूर होतो तेवढा धूर फुप्फुसात जमा होतो, तेवढाच धूर मुंबईतील प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या शरीरात जात आहे. एक सिगारेट म्हणजे पीएम 2.5 चे 22 मायक्रॉन प्रतिघनमीटर प्रमाण. एक सिगारेट ओढण्यामुळे 22 मायक्रॉन प्रतिघनमीटर प्रदूषित हवा श्वसनातून फुप्फुसात जाते. याचा विचार करता मुंबईतील वाढत्या प्रदूषणापासून मुंबईकरांच्या शरीरात पाच सिगारेटएवढा घातक धूर जमा होत आहे.
गेल्या आठवडय़ातील शनिवारी मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 185 पीएम 2.5 एवढा होता. अशा हवेत श्वास घेणे म्हणजे पाच किंवा त्याहून अधिक सिगारेट ओढण्यासारखे असल्याचे हवामान तज्ञांचे मत आहे.
दिल्लीसारखी स्थिती बनण्याची भीती
देशात सध्या राजधानी दिल्लीत सर्वाधिक प्रदूषण आहे. तेथील हवेत श्वास घेणे म्हणजे दररोज 40 सिगारेट ओढण्यासारखे असल्याचे जाणकारांचे मत आहे. मुंबईतील स्थिती वर्षागणिक आणखी बिकट बनत चालली आहे. त्यामुळे पुढच्या काही वर्षांत मुंबईत दिल्लीसारखी स्थिती बनण्याची भीती आहे.
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा
मागील काही वर्षांत मुंबई आणि परिसरात बांधकाम प्रकल्प वाढले आहेत. या प्रकल्पांपासून बाहेर पडणारे धूलीकण रोखण्यासाठी प्रशासन पातळीवर नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. त्यातच प्रत्येक दिवाळी व अन्य सण-समारंभात मोठय़ा प्रमाणावर फटाके पह्डले जातात. तसेच पॉवर प्लांट, उद्योग, कारखान्यांतून बाहेर पडणाऱया सल्फरचे प्रमाण अधिक आहे. विविध माध्यमांतून निर्माण होणारे हे घातक प्रदूषण मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा मानले जात आहे.
धक्कादायक वास्तव
z मुंबईकरांच्या शरीरात सल्फर, नायट्रोजन, कार्बन डाय ऑक्साइडसारखे विषारी वायू शिरकाव करीत आहेत.
z शहरात सर्वच विभागांत प्रदूषणामुळे दमा, टीबी, पॅन्सर, सर्दी, खोकला, डोळे, त्वचा व हृदयरोगांचे रुग्ण वाढत आहेत.
z गेल्या आठवडय़ात वांद्रे-खेरवाडी येथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक 233 होता. तेथील हवेत श्वास घेणे आठ सिगारेट ओढण्यासारखे होते.