प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बीकेसीत कार्यालय

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) ‘पर्यावरण भवना’करिता वांद्रे-कुर्ला संकुलात भूखंड देण्यात येणार आहे. 3,400 चौरस मीटरवरील या भूखंडावर एमपीसीबीचे स्वतंत्र कार्यालय उभे राहण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. सध्या एमपीसीबीचा कारभार सायन येथील एका दोन मजल्यांवर असलेल्या कार्यालयातून हाकला जातो. एमपीसीबीवरील वाढत्या जबाबदाऱ्या लक्षात घेता एका स्वतंत्र कार्यालयीन इमारतीची आवश्यकता व्यक्त होत होती.