खासदार पप्पू यादव यांनी आज महाकुंभमेळ्यातील चेंगचेंगरीच्या घटनेवरून लोकसभेत तीव्र संताप व्यक्त केला. चेंगराचेंगरीत ज्यांचा मृत्यू झाला त्यांना मोक्षप्राप्ती झाली, असे विधान धीरेंद्र शास्त्री यांनी केले होते. त्यावरून पप्पू यादव संतापले. मी कोणत्याही बाबाचे नाव घेणार नाही, पण कुंभमध्ये ज्यांना मरण आले त्यांना मोक्ष मिळाला, असे ते म्हणालेत. मग जे व्हीआयपी महाकुंभमेळ्यात येत आहेत त्या राजकारणी आणि पैशेवाल्यांना तसेच बाबा आणि नागासाधूंनीही कुंभमेळ्यात डुबकी मारून मरायला हवे. म्हणजे त्यांनाही मोक्षप्राप्ती होईल, असे यादव म्हणाले. त्यावरून सभागृहात गदारोळ झाला. पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी त्यांना रोखले.