विधानसभा निवडणुकांसाठी टपाली मतदान करणाऱया आणखी एका पोलीस अंमलदाराला मतदान करतानाचे छायाचित्र समाज माध्यमांकर प्रसारित करणे अंगाशी आले आहे. गोपनियतेचा भंग व निवडणूक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी लियाझ लियाकत पठाण या अंमलदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत अशा प्रकारचा दुसरा गुन्हा नोंदवला गेला आहे. शिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पठाण यांचे सातारा जिह्यातील कोरेगाव विधानसभेत मतदान आहे. त्यांनी 14 नोक्हेंबरला जे.जे. मार्ग येथील रिचर्डस ऍण्ड क्रुडास कंपनी येथील मतदान केंद्रात टपाली मतदान केले. पण त्याकेळी त्यांनी मोबाईलकर मतपत्रिकेचे छायाचित्र काढले क ते छायाचित्र समाज माध्यमांकर प्रसारीत केले. हा प्रकार समोर येताच निकडणूक अधिकारी मनोज्ञ कोष्टी यांनी पठाण यांच्याविरोधात जे.जे. मार्ग पोलिसांकडे तक्रार केली.