टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 20 कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, तर तक्रारदारांची संख्या वाढतच चालली आहे. आतापर्यंत पोलिसांकडे तब्बल दोन हजार गुंतवणूकदारांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. ही फसवणुकीची रक्कम सुमारे 38 कोटी असून घोटाळय़ाची व्याप्ती वाढतच चालली आहे.
कांदिवली कार्यालयात झाडाझडती
टोरेसची चार कार्यालये आणि दोघा आरोपींच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज कांदिवली येथील टोरेसच्या कार्यालयाची झाडाझडती सुरू केली. या झाडाझडतीत पोलिसांच्या हाती काय लागले ते मात्र समजू शकले नाही.
z तानियाविरोधात 2008 मध्ये सहार पोलिसांनी बनावट पासपोर्ट बनविल्याचा गुन्हा दाखल केला होता. तानियाने तेव्हा स्वतः बनावट पासपोर्ट बनवला होता. त्या गुह्यातून तानियाला मोकळीक कशी मिळाली याचादेखील पोलीस तपास करीत आहेत.
z तानिया, व्हिक्टोरिया, ओरेना, आर्टेन, व्हॅलेटिंना व अन्य फरार आरोपी हे प्रचंड शातीर आहेत. हे आरोपी हजारो नागरिकांची आर्थिक फसवणूक करून पसार झालेले आरोपी आता दुसऱ्या देशात अथवा अन्य ठिकाणी अशाप्रकारचा झोल करू शकतील असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
फसवणुकीतला पैसा भारतातच की बाहेर नेला…
आरोपींनी पद्धतशीर कट रचून नागरिकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडले. नागरिकांनी गुंतवणूक केलेले कोटय़वधी रुपयांचे आरोपींनी नेमके केले काय? हा पैसा भारतातच आहे की हवालामार्फत तो देशाबाहेर नेला याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांच्या हाती आतापर्यंत 20 कोटींची मालमत्ता लागली आहे. अजून एजंट लोकांना दिलेल्या 14 कार जप्त करणे बाकी आहे. पण एकंदरीत परिस्थितीनुसार शक्य तितक्या गुंतवणूकदारांना पैसे परत मिळतील, असे पोलिसांकडून सांगण्यात येते.
आतापर्यंत 20 कोटींचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी आतापर्यंत टोरेसचे कार्यालय व तीन बँक खाती गोठवून तब्बल 20 कोटी रुपयांपर्यंतचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात पाच कोटी 25 लाखांची रोकड, एक कोटी 20 लाख रुपये किंमतीचे हजारो खडे, एक कोटी पाच लाखांचे सोने आणि तीन खात्यांत 11 कोटींची रोकड गोठविण्यात आली आहे.
व्हिसा संपण्याच्या आधीच पलायन
ओलेना, आर्टिन हे प्रमुख आरोपींपैकी आहेत. तर या फसवणुकीच्या प्रकरणातील सर्वाधिक आरोपी हे युक्रेन देशाचे आहेत. या आरोपींचा व्हिसा येत्या काही दिवसांत संपणार होता. ते लक्षात ठेवूनच आरोपींनी शक्य होईल तितकी गुंतवणूक करण्यास लोकांना भाग पाडून पैसा कमावला आणि ख्रिसमस सणाच्या नावाखाली
तौसिफचा शोध सुरू
तौसिफ रियाद हा आरोपींमधला मुख्य दुवा असून त्याचा शोध सुरू आहे. टोरेस कंपनीसाठी भाडेतत्त्वावर कार्यालय मिळवून देणे, भाडेकरार करणे, कंपनीच्या स्थापनेसाठी कागदपत्र बनविणे, याबाबत त्याला माहिती असल्याने तो एकदा हाती लागला की सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात येते.