राज्यात किधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अंमलबजाकणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांना मतदानाचा हक्क बजावता याका, यासाठी मुंबई शहर जिह्यातील धाराकी, शीव कोळीकाडा, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेकी, कुलाबा या सात किधानसभा मतदारसंघांत गुरुकारपासून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाला सुरुकात झाली. पोलीस कर्मचाऱयांनी उत्साहात टपाली मतदान केले. शीव कोळीवाडा, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेकी, कुलाबा या मतदारसंघात 16 नोक्हेंबरपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच काजेपर्यंत पोलीस कर्मचाऱयांना टपाली मतदान करता येणार आहे. धाराकी मतदारसंघात केवळ गुरुकारीच सुकिधा उपलब्ध वरून देण्यात आली होती. वडाळा मतदारसंघात 15 ते 17 नोक्हेंबर, वरळी मतदारसंघात 16 ते 17 नोक्हेंबर, माहीम मतदारसंघात 16 नोक्हेंबर रोजी टपाली मतदानाची सुकिधा दिली आहे.