बीडमध्ये गुन्हा दाखल असलेल्या 100 जणांचा बंदूक परवाना रद्द, पोलिसांची कारवाई

बीडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बीडमध्ये बीडमध्ये गुन्हा दाखल असलेल्या 100 जणांचा बंदूक परवाना रद्द करण्यात आला आजही. बीड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मागील वर्षी कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाच व्हिडीओ शोधलं मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली होती. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परळी येथील कैलास फड याने हवेत गोळीबार केला होता. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि बंदूक बाळगणाऱ्यांची संख्या समोर आली होती. यातच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी अशा प्रकारे व्यवहार करणाऱ्या लोकांवर कारवाईचा बडगा उगारला आणि बीडमध्ये गुन्हा दाखल असलेल्या 100 जणांचा बंदूक परवाना रद्द केला.