रिक्षावर लिहिले ‘जय श्री राम’, पोलिसांनी ठोठावला 3500 रुपयांचा दंड

‘भारत का बच्चा बच्चा बोलेगा जय श्री राम’ असे रिक्षावर लिहिल्यामुळे एका रिक्षा वाल्याला पोलिसांनी 3500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हरयणातील फरिदाबादमध्ये हा सर्व प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सुरज असे रिक्षावाल्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याने रिक्षावर “भारत का बच्चा बच्चा बोलेगा जय श्री राम 10% छुट पायेगा” असा मजकूर लिहिला आहे. हा मजकूर लिहिल्यामुळे एक महिला पोलीस त्याच्याकडून 200 रुपये मागत असल्याचा दावा रिक्षा वाल्याने केला आहे. त्याचबरोबर तू जर रिक्षावर जय श्री राम लिहिणार असशील, तर रिक्षावर असाच चलान लावण्यात येईल, अशी धमकी महिला पोलिसाने दिल्याचे रिक्षा वाल्याचे म्हणने आहे. आतापर्यंत रिक्षावर तीन ते चार चलान लावण्यात आले असून एकूण दंड 3500 रुपये इतका झाल्याचे रिक्षा वाल्याने सांगितले.