मालवणमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणांमुळे संताप

रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान मालवण वायरी आडवन येथील एका मुस्लिम भंगार व्यावसायिक आणि त्याच्या कुटुंबीयाने भारताच्या विरोधात घोषणा देतानाच पाकिस्तान झिंदाबाद, अफगाणिस्तान झिंदाबादचे नारे दिल्याची खळबळजनक घटना घडली. याबाबतचे वृत्त रात्री मालवणात वाऱ्यासारखे पसरल्यानंतर रात्रीच काहींनी मालवण आडवन येथे त्या मुस्लिम भंगारवाल्याच्या ठिकाणी धाव घेत त्या कुटुंबीयांना जाब विचारला. यावेळी मुस्लिम कुटुंबाने उद्धट उत्तरे देत हिंदू जमावावर चाल करीत शिव्या दिल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू समाजाने त्या कुटुंबाला चांगलाच प्रसाद दिला.

या घटनेबद्दल मुस्लिम कुटुंबाच्या विरोधात सचिन संदीप वराडकर या युवकाने मालवण पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी यातील एकाला ताब्यात घेतले आहे. एकूणच या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मालवणात संतप्त प्रतिक्रिया उमटून सकल हिंदू समाजाने एकवटत  सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मालवण शहरातून विराट मोटरसायकल रॅली काढून निषेध केला.