श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांचा मुलगा योशिया राजपक्षे याला शनिवारी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. यापूर्वी, त्यांचे काका आणि माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचीही गेल्या आठवड्यात पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली होती. माजी राष्ट्रपतींच्या मुलाला भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आल्याने श्रीलंकेत खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, माजी नौदल अधिकारी योशिता यांना त्यांच्या मूळ गावी बेलियाट्टा येथून अटक करण्यात आली. 2015 पूर्वी त्यांच्या वडिलांच्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात मालमत्ता खरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसंदर्भात त्यांना अटक करण्यात आली आहे. योशिता हा महिंदा राजपक्षेच्या तीन मुलांपैकी दुसरा मुलगा आहे. योशिता यांच्या अटकेपूर्वी, त्यांचे काका आणि माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचीही गेल्या आठवड्यात पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली होती. महिंद्रा राजपक्षे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. गेल्या महिन्यात सरकारने त्यांची सुरक्षा कमी केली होती. त्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.