
मुंबईत एक बांगलादेशी दाम्पत्य अवैधरित्या राहत होते. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे दाम्पत्य 25 वर्षांपूर्वी मुंबईत आले होते. त्यांना एक 23 वर्षाचा मुलगाही आहे. पोलीस या मुलालाही अटक करण्याची शक्यता आहे.
मिड डे ने याबाबत वृत्त दिले आहे. इक्बाल हनीफ शेख आणि त्याची पत्नी अदोरी इक्बाल शेख हे 25 वर्षांपूर्वी मुंबईत अवैधरित्या आले होते. त्यानंतर या दोघांनी मुंबईत बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करायला सुरुवात केली. दोन वर्षानंतर त्यांना एक मुलगाही झाला. पोलिसांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी इक्बालच्या घरी धाड टाकली. चौकशीत या दोघांनी आपण बांगलादेशी असल्याचे कबुल केले. पोलीस त्यांच्या मुलालाही अटक करू शकतात. कारण जर पालक अवैधरित्या हिंदुस्थानात घुसले असतील तर त्यांच्या अपत्याला नागरिकत्व मिळत नाही.
एका पोलिसांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की बांगलादेशी नागरिक हिंदुस्थानात येतात आणि आपलं नाव बदलून राहतात. हे बांगलादेशी घुसखोर खोटी कादपत्र बनवतात आणि देशात राहतात. अनेक केसेसमध्ये त्यांना जामीनही मिळते. अशा प्रकरणात चौकशी आणि कारवाई करताना अनेक अव्हानं असतात असेही या पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले.