500 व 200 रुपये दराच्या बनावट नोटा बाजारात चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका हेल्परला शिवाजीनगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून 7 हजार 600 रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या.
एक व्यक्ती 500 व 200 रुपये दराच्या बनावट नोटा घेऊन शिवाजीनगर येथील उत्तर भारतीय सेवा कंपाऊंडमधील जनरल शिवमंदिराजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचून रामलुश जोसेफ मिझ (51) या व्यक्तीला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता 500 व 200 रुपये दराच्या 29 बनावट नोटा मिळाल्या.