पोखरण अणुचाचणीत मोठी भूमिका बजावलेले शास्त्रज्ञ विनायक कोळवणकर गायब

पोखरण अणुचाचणीत मोठी भूमिका बजावणारे आणि भूकंपशास्त्रातील संशोधनासाठी गौरविले गेलेले डॉ. होमी भाभा अणुसंशोधन केंद्रातील 76 वर्षीय निवृत्त शास्त्रज्ञ विनायक कोळवणकर हे गेल्या पाच दिवसांपासून गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोळवणकर यांनी माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि डॉ. अनिल काकोडकर यांच्यासोबत काम केले होते. ते वांद्रय़ातील न्यू एमआयजी का@लनीत राहतात. फुले आणायला जातो असे सांगून 5 सप्टेंबरला सकाळी ते घराबाहेर पडले, ते परतलेच नाहीत. कोळवणकर हे स्मृतिभंशाच्या आजाराने ग्रस्त असल्याने ते बेपत्ता झाल्याचे पोस्टर्सही विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. वांद्रे येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यातही ते बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने दाखल केली आहे.’चार वर्षांपासून कोळवणकर हे स्मृतिभंशाच्या आजाराने ग्रस्त आहेत. कंपाऊंडमध्येच फुले आणायला जातो असे सांगून ते केअरटेकरशिवायच घराबाहेर पडले. दरम्यान, कोळवणकर यांचे पुत्र अमित हे लंडनमध्ये राहतात.

भूकंपशास्त्रात विशेष प्रावीण्य

भूकंपाची पूर्वसूचना देण्यासंदर्भात त्यांनी मोलाचे काम केले. माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक देऊन कोळवणकर यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या संशोधनामुळे देशांना भूकंप होण्याआधीच्या स्थानांचा अंदाज बांधण्यास मदत झाली. त्यांचे कार्य 125 परदेशी भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.

पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले

पोलिसांनी वांद्रे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात कोळवणकर वांद्रे, अंधेरी, सांताक्रुझ रेल्वे स्टेशन करत पुन्हा वांद्रय़ातील पेट्रोल पंपाजवळ दिसले. घरातून निघाले तेव्हा त्यांनी हाफ टी-शर्ट आणि ट्रक पँट घातली होती. ते कुठे दिसल्यास 9594094095, 9869131007 या क्रमांकांवर संपर्प साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.