पोकोने फ्लॅगशिप एक्स सिरिजमधील पोको एक्स7 5जी आणि पोको एक्स7 प्रो 5जी हे दोन फोन हिंदुस्थानमध्ये लॉन्च केले आहेत. जयपूरमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमार याच्या उपस्थितीत हे फोन लॉन्च करण्यात आले. पोकोचे हे फोन दिसायलाही छान असून किंमतही आवाक्यात आहे.
पोको एक्स7 5जीची वैशिष्ट्ये –
– 1.5के एएमओएलईडी 3डी कर्व्ह डिस्प्ले
– कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस 2
– 5500 एएमएच बॅटरी
– 50 मेगापिक्सल सोनी एलवायटी- 600 प्रायमरी कॅमेरा
किंमत –
पोको एक्स7 प्रो 5जी 19,999 रूपयांपासून उपलब्ध असेल. आयसीआयसीआय, एसबीआय, एचडीएफसी बँक कार्डस् किंवा उत्पादन एक्स्चेंजच्या माध्यमातून 2000 रूपयांची सूट मिळेल. पोको एक्स7 ची विक्री 17 जानेवारी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होत आहे.
पोको एक्स७7 प्रो 5जीची वैशिष्ट्ये –
– 6550 एमएएच बॅटरी (19 मिनिटात शून्य ते 50 टक्के चार्ज होते)
– प्रो मीडियाटेक डिमेन्सिटी 8400 अल्ट्रा प्रोसेसर
– 6.67 इंच एएमओएलईडी फ्लॅट डिस्प्ले
– कॉर्नरिंग गोरिला ग्लास7 आय, 240 हर्ट्झ टच सॅम्प्लिंग रेट आणि 2560 हर्टझ
– 50 मेगापिक्सल सोनी एलवायटी-600 कॅमेरा
किंमत –
पोको एक्स7 प्रो 5 जी फोन 24,999 रुपयांपासून पुढे उपलब्ध आहे. पहिल्या सेलमध्ये ग्राहकांना १,००० रुपयांचा कूपन डिस्काउंट मिळणार आहे. तसेच आयसीआयसीआय एसबीआय, एचडीएफसी बँक कार्डस् किंवा उत्पादन एक्स्चेंजच्या माध्यमातून 2000 रुपयांची सूट मिळेल. पोको एक्स7 प्रोची विक्री 14 जानेवारी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होत आहे.
आयफोन यूजर्ससाठी मोठी अपडेट, आता ‘या” प्रॉब्लेमचा सामना करावा लागणार नाही