सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निवासस्थानी गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. गणपतीसमोर नतमस्तक झाले. नंतर त्यांनी आरतीही केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कुडता, धोतर, उपरणं आणि गांधी टोपी असा खास मराठमोळा पेहराव केला होता.