अंतराळात जाण्यापूर्वी ‘नॉन-बायोलॉजिकल’ पंतप्रधानांनी मणिपूरला जावं! जयराम रमेश यांचा टोला

हिंदुस्थानच्या पहिल्या मानव अवकाश मोहिमेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंतराळात पाठवण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचे विधान ‘इस्त्रो’चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी केले होते. तशी तयारीही सुरू असल्याचे वृत्त एका इंग्रजी वेबसाईटने दिले असून याच वृत्ताचा आधार घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. अंतराळात जाण्यापूर्वी ‘नॉन-बायोलॉजिकल’ पंतप्रधानांनी मणिपूरला जावं, असा टोला जयराम रमेश यांनी लगावला.

माध्यमांशी बोलताना एस. सोमनाथ यांनी गगनयान या मोहिमेबद्दल माहिती दिली. यादरम्यान विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “जर देशाच्या पंतप्रधानांना अंतराळात जायचं असेल तर त्यांनी गगनयानातून जावं. गगनयान मोहीमही यशस्वी होईल आणि आम्ही लोकांना सुरक्षितपणे पाठवू शकतो हा विश्वासही दृढ होईल.”

एस. सोमनाथ यांच्या विधानाचा आधार घेत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदींवर निशाणा साधला. अंतराळात जाण्यापूर्वी ‘नॉन-बायोलॉजिकल’ पंतप्रधानांनी मणिपूरला जावं, असा टोला जयराम रमेश यांनी लगावला. गेल्या वर्षीपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. यात शेकडो लोकांच मृत्यू झाला असून हजारो लोकं विस्थापित झाले आहेत. मात्र पंतप्रधानांनी यावर चकार शब्दही काढलेला नाही. त्यामुळे विरोधक सातत्याने या मुद्द्यावरून त्यांच्यावर हल्ला चढवत आहेत.

3 जुलै रोजी राज्यसभेतील भाषणामध्ये मोदींनी मणिपूरचा ओझरता उल्लेख केला. मणिपूरमध्ये शांतता स्थापित करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे मोदी म्हणाले होते. याचाही जयराम रमेश यांनी समाचार घेतला. पंतप्रधानांनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली नाही? आमदार, खासदारांची चर्चा का केली नाही? ते वेगवेगळ्या देशांचा दौरा करतात, पण मणिपूरला जात नाहीत. यावरून त्यांना मणिपूरची किती चिंता आहे, हे दिसते, असा उपरोधित टोला जयराम रमेश यांनी लगावला.

मणिपूरवर आता नैसर्गिक संकट; सहा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, दोघांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत

पंतप्रधानांनी राज्यसभेत मणिपूरबाबत जी माहिती दिली त्या उलट तिथली परिस्थिती आहे. 3 मे 2023 पासून मणिपूर धुसमुसत आहे. दोन समाजांमध्ये तणावर असून हिंसाचार सुरूय. फेब्रुवारी 2022 ला भाजप आणि आघाडीतील पक्षांना बहुमत मिळाले होते. गेल्या 15 महिन्यांपासून मणिपूर जळत असून आतापर्यंत मोदी तिथे गेलेले नाहीत. हतबल होऊन ते यावर बोलत आहेत, असा हल्लाबोल जयराम रमेश यांनी केला.

नरेंद्र मोदी वरून टपकले! ‘जन्म बायोलॉजिकल नाही’ विधानाचा राहुल गांधी यांनी पुन्हा घेतला समाचार