केंद्र सरकराने तीन कृषी कायदे मागे घेतले होते, हे कायदे पुन्हा लागू करावेत अशी मागणी भाजप खासदार कंगना रनौतने केली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावे असे आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे.
राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, भाजपच्या एका खासदाराने तीन काळे कृषी कायदे परत आणण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मागणीशी सहमत आहेत का? की परत बदमाशी करत आहेत.? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर स्पष्टीकरण द्यावे. जर हे कायदे परत आणले तर इंडिया आघाडी याचा विरोध करणार. या आंदोलनात 700 लोक शहीद झाले होते, मोदींनी त्यांना दोन मिनिटं श्रद्धांजली सुद्धा वाहू दिली नाही असेही राहुल गांधी म्हणाले.
सरकार की नीति कौन तय कर रहा है? एक भाजपा सांसद या प्रधानमंत्री मोदी?
700 से ज़्यादा किसानों, खास कर हरियाणा और पंजाब के किसानों की शहादत ले कर भी भाजपा वालों का मन नहीं भरा।
INDIA हमारे अन्नदाताओं के विरुद्ध भाजपा का कोई भी षडयंत्र कामयाब नहीं होने देगा – अगर किसानों को नुकसान… pic.twitter.com/ekmHQq6y5D
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 25, 2024