
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा सौदी अरब दौऱयावर जाणार आहेत. 22 ते 23 एप्रिल असे दोन दिवस ते सौदीत असणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांचा हा तिसरा सौदी दौरा आहे. याआधी ते 2016 आणि 2019 मध्ये सौदी अरबला गेले होते. 2023 मध्ये सौदी अरबचे क्राउन प्रिन्स हिंदुस्थान दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी जी 20 शिखर संमेलनात भाग घेतला होता. पंतप्रधान मोदी फेब्रुवारीमध्ये अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर 11 आणि 12 मार्चला दोन दिवसीय मॉरिशस दौऱयावर गेले होते.