पंतप्रधान मोदी पुन्हा विदेश दौऱ्यावर जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. मोदी 21 ते 22 डिसेंबरला कुवेतला भेट देणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान मोदी हे कुवेतमधील हिंदुस्थानी समुदायाशीही संवाद साधणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी कुवेतचे परराष्ट्र मंत्री एच.ई. अब्दुल्ला अली अल-याह्या यांची भेट घेतली होती. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कुवेतला भेट दिली होती.