पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी देशाला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवले. हे स्वप्न तर पूर्ण झालेच नाही उलट गेल्या 10 वर्षांमध्ये देशात महागाई, बेरोजगारी वाढली. एवढेच नाही तर मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये देश कर्जाच्या खाईत बुडाल्याचे समोर आले आहे. जगामध्ये कर्जात बुडालेल्या ‘टॉप 10’ देशांमध्ये हिंदुस्थान आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून देशाची सूत्रे 2014मध्ये हाती घेतली. तेव्हा देशावर 49 लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र त्यांचा दुसरा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत देशावरील कर्जाचा आकडा 205 लाख कोटींवर पोहोचला आहे. याचाच अर्थ गेल्या 10 वर्षांमध्ये देशावरील कर्ज टिप्पट झाले आहे.
दरम्यान, 2004 ते2014 पर्यंत यूपीएचे सरकार सत्तेत होते. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये देशावर कर्जाचा बोझा वाढला नसल्याचे आकडेवारीतून दिसून येते. 2004मध्ये हिंदुस्थानवर 17 लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. 10 वर्षामध्ये हे कर्ज 55 लाख कोटींपर्यंत गेले. त्यानंतर मोदी सरकार सत्तेत आले. अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेत आल्या मोदी सरकारच्या कार्यकाळात कर्जाचा हा आकडा 205 लाख कोटींवर गेला. अर्थात गेल्या 67 वर्षामध्ये होऊन गेलेल्या 14 पंतप्रधानांना जे जमले नाही ते मोदींनी करून दाखवले.
जगभरातील देशांचा विचार केल्यास सर्वाधिक कर्ज अमेरिकेच्या डोक्यावर आहे, तर चीन दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत हिंदुस्थान आठव्या क्रमांकावर आहे. धक्कादायक म्हणजे पाकिस्तान आणि श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती बिकट असली, तरीही कर्जदारांच्या ‘टॉप 10’ देशांच्या यादीत त्यांचा समावेश नाही. दुसरीकडे जगामध्ये असा एकच देश आहे ज्याच्यावर कर्जाचा बोझा नाही. त्या देशाचे नाव म्हणजे ब्रुनेई.
कर्जाच्या खाईत बुडालेले देश
- अमेरिका – 34 हजार अब्ज डॉलरचे कर्ज
- चीन – 14 हजार अब्ज डॉलरचे कर्ज
- जपान – 10 हजार अब्ज डॉलरचे कर्ज
- ग्रीस – 3 हजार 999 अब्ज डॉलरचे कर्ज
- फ्रान्स – 3 हजार अब्ज डॉलरचे कर्ज
- इटली – 2 हजार 800 अब्ज डॉलरचे कर्ज
- पोर्तुगाल – 254 लाख कोटींचे कर्ज
- हिंदुस्थान – 205 लाख कोटींचे कर्ज
- भुतान – 2.39 लाख कोटींचे कर्ज
- मोजाम्बिक – 17.21 लाख कोटींचे कर्ज
View this post on Instagram