महाराष्ट्रातून पळवून नेलेल्या टाटा एअरबस प्रकल्पाचे वडोदऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्रातील नागपूर येथे येणारा टाटा एअरबस प्रकल्प गुजरतला पळविण्यात आला होता. सोमवारी या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सॅनचेझ यांनी गुजरातमधील वडोदरा येथे उद्घाटन केले.

नागपूरमध्ये सी-295चा लष्करी एअरक्राफ्टचा टाटा एअरबस प्रकल्प मिहान येथे होणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. मात्र त्यानंतर अचानक एक हजारो कोटी रुपयांच्या  गुंतवणुकीचा सी -295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प वडोदऱ्यात हलवण्यात आला. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असताना सरकारकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात होती.

प्रकल्प का महत्त्वाचा…

लष्करी विमानाची निर्मिती खासगी कंपनीद्वारे केला जाणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे.

या प्रकल्पाचा एकूण खर्च 21,935 कोटी रुपये आहे. या विमानाचा वापर नागरी उद्देशांसाठीही केला जाऊ शकतो.