![rahul gandhi narendra modi](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/rahul-gandhi-narendra-modi-696x447.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दरम्यान मोदींनी व्हाईटहाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत चर्चा केली. यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. यावेळी एका पत्रकाराने गौतम अदानी यांच्या प्रकरणाबाबत मोदींनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले की, दोन्ही देशाचे नेते अशा भेटीवेळी वैयक्तिक बाबींवर चर्चा करत नाही. मोदींच्या याच विधानावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. देशात प्रश्न विचारला तरी मौन राहतात. परदेशात प्रश्न विचारलात तर ती वैयक्तिक बाब म्हणतात. अमेरिकेतही मोदींनी अदानीच्या भ्रष्टाचारावर पडदा टाकला. जेव्हा मित्राचा खिसा भरणे हेच मोदींसाठी ‘राष्ट्र उभारणीचे कार्य’ असते, तेव्हा लाच घेणे आणि देशाची संपत्ती लुटणे ही त्यांच्यासाठी ‘वैयक्तिक बाब’ बनते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
देश में सवाल पूछो तो चुप्पी,
विदेश में पूछो तो निजी मामला!अमेरिका में भी मोदी जी ने अडानी जी के भ्रष्टाचार पर पर्दा डाल दिया!
जब मित्र का जेब भरना मोदी जी के लिए “राष्ट्र निर्माण” है, तब रिश्वतखोरी और देश की संपत्ति को लूटना “व्यक्तिगत मामला” बन जाता है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 14, 2025
काँग्रेसनेही मोदींचा व्हिडीओ शेअर करत याच संदर्भात एक ट्विट केले आहे. अमेरिकेमध्ये एका पत्रकाराने पंतप्रधान मोदींना त्यांच्या प्रिय मित्राच्या भ्रष्टाचारा प्रकरणाविषयी प्रश्न विचारला. नरेंद्र मोदी यांनी ही वैयक्तिक बाब असल्याचे म्हणत गोलमटोल उत्तर दिले. प्रश्न विचारताच त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता, असे काँग्रेसने म्हटले.
– श्रीलंका, केनिया, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देशांमध्ये अदानींविरुद्ध चौकशी सुरू आहे, लोक रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत
– अमेरिकेत, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अदानींविरुद्ध वॉरंट देखील जारी करण्यात आले
– अदानींवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत, पण नरेंद्रसाठी ही वैयक्तिक बाब आहे
हा सर्व प्रकार लज्जास्पद आहे, असेही काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अमेरिका में पत्रकार ने नरेंद्र मोदी के परम मित्र अडानी के भ्रष्टाचार से जुड़ा सवाल किया.
नरेंद्र मोदी इसे व्यक्तिगत मामला बताते हुए इधर-उधर की बात करने लगे. सवाल सुनते ही चेहरे का रंग उड़ गया.
• अडानी को लेकर श्रीलंका, केन्या, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया और कई देशों में जांच चल… pic.twitter.com/2TNctqVmTh
— Congress (@INCIndia) February 14, 2025