बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांप्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशशी चर्चा करावी अशी मागणी बॅनर्जी यांनी केली आहे. जर पंतप्रधान मोदी यांना चर्चा करण्यात काही अडचण आहे तर परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा करावी असेही बॅनर्जी म्हणाल्या.
विधानसभेत बांगलादेशप्रकरणी बोलताना बॅनर्जी म्हणाल्या की, गेल्या 10 दिवसांपासून केंद्र सरकारने बांगलादेशप्रकरणी मौन साधलं आहे. पण त्यांचा पक्ष भाजप सीमेवरील आयात निर्यातीवर बंदी घालण्याची धमकी देत आहेत. जोपर्यंत केंद्र सरकार यावर आदेश देत नाही तोवर असे निर्णय घेता येत नाही. तसेच बांगलादेशात संयुक्त राष्ट्रसंघ स्थापित समिती पाठवावी अशी मागणीही बॅनर्जी यांनी केली आहे.
बॅनर्जी म्हणाल्या की कुठल्याही जाती आणि धर्माच्या लोकांवर झालेल्या अत्याचाराचा आम्ही निषेध करतो. गरज पडल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा परराष्ट्र मंत्र्यांनी बांगलादेशशी चर्चा करावी अशी मागणी बॅनर्जी यांनी केली.
बांगलादेशात असंच सुरू राहिलं तर आम्ही आमच्या लोकांना परत आणायला तयार आहोत. आम्ही अर्धी भाकर खाऊ पण त्यांना खाण्या पिण्यात कुठलीही कमतरता भासू देणार नाही असेही बॅनर्जी म्हणाल्या.