PM Modi ‘प्रो अमेरिकन’ पंतप्रधान! अमेरिेकेचे राजदूत गार्सेटींच्या विधानाची चर्चा

pm-modi-most-pro-american-pm-in-indian-history-says-us-ambassador-garcetti

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकाचा तीन दिवसांचा दौरा आटोपून हिंदुस्थानात परतत आहेत. क्वाडच्या (QUAD) निमित्ताने हा दौरा आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान, अमेरिकेचे हिंदुस्थानातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी सोमवारी युनायटेड स्टेट्स आणि हिंदुस्थान यांच्यातील घनिष्ठ संबंधांबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बाडेन यांच्यातील घनिष्ठ मैत्रीचा देखील उल्लेख केला.

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गार्सेटी यांनी पंतप्रधान मोदींचं वर्णन “हिंदुस्थानच्या इतिहासातील सर्वाधिक ‘प्रो अमेरिकन’ पंतप्रधान” असं केले आणि ‘आम्ही अमेरिकेच्या इतिहासात पाहिलेले सर्वात जास्त ‘प्रो इंडियन’राष्ट्राध्यक्ष”, असं म्हणत बायडेन यांचं कौतुक केलं.

या दोन्ही राष्ट्रप्रमुखांची घनिष्ठ मैत्री असल्याचा उल्लेख देखील गार्सेटी यांनी यावेळी केला. ‘दोघेही आपल्या देशांतील लोकांचे प्रतिनिधी आहेत, ज्यांच्या हावभावातून राष्ट्रांमधील वाढती जवळीक स्पष्ट दिसते.’

दोन देशांमधील वेगाने विस्तारत असलेल्या संबंधांच्या केंद्रस्थानी दोन्ही नेत्यांची घट्ट मैत्री आहे, ज्याने अलीकडच्या वर्षांत धोरणात्मक, आर्थिक आणि सांस्कृतिक सहकार्यात वाढ केली, असा दावा गार्सेटी करतात.

यावेळी त्यांनी क्वाडचे (QUAD) महत्त्व देखील अधोरेखित केले. अमेरिका, हिंदुस्थान, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेला हा एक धोरणात्मक मंच आहे. क्वाड म्हणजे त्याला इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सहकार्यासाठी ‘शक्तिशाली’ व्यासपीठ असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं.

‘द क्वाड एक अशी जागा आहे जिथे आम्ही एक ध्येय निश्चित करतो, तत्त्वे ठरवतो करतो आणि उपाय शोधतो’, अशी भूमिका गार्सेट्टी यांनी मांडली.