बॉलीवूडचे शोमॅन राज कपूर यांची 14 डिसेंबरला शंभरावी जयंती आहे. यानिमित्त 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत पीव्हीआर आयनॉक्स चित्रपटगृहात राज कपूर यांच्या चित्रपटांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे आमंत्रण देण्यासाठी बुधवारी कपूर कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत कपूर कुटुंबीयांनी पंतप्रधानांशी मनमोकळा संवाद साधला. या खास क्षणांचे फोटो कपूर कुटुंबीयांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.