Modi Cabinet : केंद्राचे खातेवाटप जाहीर, भाजपचा मित्रपक्षांना झटका; वाचा कोणाला मिळाले कोणते खाते

नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वांचं लक्ष खातेवाटपाकडे लागून होते. आता भाजपप्रणित एनडीए सरकारचे खातेवाटप जाहीर झाले आहे. भाजपने खातेवाटपात मित्रपक्षांना झटका दिला असून अत्यंत महत्त्वाची प्रमुख चार खाती आपल्याकडेच ठेवली आहेत. मंत्रिपद न दिल्याने आधीच एनडीएतील काही पक्षांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. असे असताना आता भाजपने महत्त्वाची खाती आपल्याकडेच ठेवल्याने एनडीएतील नाराजी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 24 तासांनी खातेवाटप जाहीर झाले आहे. अत्यंत महत्त्वाची आणि प्रमुख 4 खाती भाजपने या सरकारमध्येही आपल्याकडेच ठेवली आहेत. विशेष म्हणजे त्यात कुठलाही बदल झालेला नाही. यात अमित शहा, राजनाथ सिंह, एस. जयशंकर आणि निर्मला सीतारामन यांची खाती कायम ठेवण्यात आली आहेत.

खातेवाटपात अमित शहा यांना गृह मंत्रालय, राजनाथ सिंहांना संरक्षण, एस. जयशंकर परराष्ट्र आणि निर्मला सीतारामन यांना अर्थ मंत्रालय देण्यात आले आहे. यासोबतच महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे परिवहन खातेही कायम ठेवण्यात आले आहे. नितीन गडकरी यांच्या खात्याला दोन राज्यमंत्री देण्यात आले आहेत.

पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमध्ये कुणाला कुठली खाती दिली? पाहा संपूर्ण यादी…

> राजथान सिंह – संरक्षण
> अमित शहा – गृह
> एस. जयशंकर – परराष्ट्र
> निर्मला सीतारामन – अर्थ
> नितीन गडकरी – परिवहन
> शिवराज सिंह चौहान – कृषी आणि ग्रामविकास
> मनोहर लाल खट्टर – ऊर्जा आणि गृहनिर्माण
> अश्विनी वैष्णव – रेल्वे आणि माहिती प्रसारण
> पियुष गोयल – वाणिज्य
> जीतन राम मांझी – एमएसएमई
> राममोहन नायडू – नागरी उड्डाण विमान वाहतूक
> चिराग पासवान – क्रीडा-युवा आणि अन्न प्रक्रिया उद्योग
> भूपेंद्र यादव – पर्यावरण
> गजेंद्र शेखावत – पर्यटन आणि संस्कृती
> सीआर पाटील – जलशक्ती
> किरेन रिजीजू – संसदीय कामकाज
> धर्मेंद्र प्रधान – शिक्षण
> एचडी कुमारस्वामी – अवजड उद्योग
> जे. पी. नड्डा – आरोग्य
> प्रल्हाद जोशी – अपारंपरिक ऊर्जा आणि अन्न व ग्राहक
> हरदीप सिंग पुरी – पेट्रोलियम
> अन्नपूर्णा देवी – महिला आणि बालविकास
> ज्योतिरादित्य शिंदे – दूरसंचार
> गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग
> मनसुख मांडवीय – कामगार आणि रोजगार