इंदिरा गांधी यांच्या काळात मध्यमवर्गीयांवर 90 टक्के टॅक्स? पंतप्रधान मोदींचा दावा निघाला खोटा

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात मध्यमवर्गीयांवर 90 टक्के कर लावला जात होता, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. पण हा दावा पूर्णपणे खोटा आहे, पंतप्रधान मोदी खोटं बोलले असा दावा संपादक एम. के. वेनू यांनी केला आहे.

वेनू यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, 1964 साली इंदिरा गांधी यांच्या काळात मध्यमवर्गीयांवर 90 टक्के आयकर लावला नव्हता. पण एवढा कर फक्त अतिश्रीमंतांवर लावला होता, असे वेनू म्हणाले. तसेच मध्यमवर्गीयांवर कुठलाही कर नव्हता, मंत्रिमंडळातले मंत्रीही हे खोटं पसरवत आहेत, असेही वेनू म्हणाले.