पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी लोकसभेत भाषण झाले. यावेळी मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी घोषणा दिल्या आणि पंतप्रधान मोदींना घेरले. राज्यसभेत आज पंतप्रधान मोदींचे भाषण झाले. राज्यसभेतही पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू होताच विरोधी पक्षांनी घोषणा दिल्या. घोषणात देतच विरोधी पक्षांनी सभात्याग केला. विरोधी पक्षनेत्याला बोलण्याची परवानगी दिली गेली नाही. विरोधी पक्षाच्या नेत्याला बोलण्याची संधी द्यायला हवी होती, असे विरोधी पक्षांनी म्हटले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी सभागृहात चुकीचे बोलले. सत्य सोडून दुसरेच काहीतरी बोलण्याची त्यांची सवयच आहे. तुम्ही संविधान बनवलेले नाही. तुम्हीला त्याच्या विरोधात होता, एवढेच आपण पंतप्रधानांना विचारले. संविधान बाजून आणि विरोधात कोण आहेत? हे मी स्पष्ट करत होतो, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
यांनीच (आरएसएस) संविधानाला विरोध केला होता. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरूंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. आणि आता आम्ही आंबेडकरांचा अपमान केल्याचा खोटा आरोप ते करत आहेत. लोकसभेत काल त्यांनी हाच आरोप केला होता. आणि आजही तोच आरोप करत आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत काय म्हटले आणि आरएसएसने ऑर्गनायजरमध्ये का लिहिले आहे, ते मी सांगत होतो. आम्हाला बोलू द्या, अशी विनंती आम्ही राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि पंतप्रधान मोदी यांना केली. पण त्यांनी आम्हाला बोलण्याची संधी दिली नाही. मला बोलण्यासाठी एक मिनिटही देऊ शकत नव्हते का? असा सवाल आंबेडकर यांनी केला.
मल्लिकार्जुन खरगे यांचा अपमान!
राज्यसभेत विरोधी पक्षांनी सभात्याग केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मल्लिकार्जुन खरगे एका घटनात्मकपदावर आहेत. म्हणून पंतप्रधान असो की सभागृहाचे सभापती खरगे यांचा सन्मान करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. पण आज त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण विरोधी पक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहे. आणि त्यामुळे आम्ही सभात्याग केला, असे शरद पवार म्हणाले.