गेल्या 8 महिन्यांपासून मणिपूर अक्षरशः जळत आहे. अजूनही लोकांच्या हत्या होत आहेत. अनेकजण बेघर होत आहेत, असे असताना मोदींना तिकडे जाण्यासाठी वेळ नाही. उलट मोदी समुद्र किनाऱ्यावर निवांत फेरफटका मारत आहेत. मस्त पह्टोबाजी करत आहेत. त्यांची मौजमजा सुरू आहे. अशा शब्दात काँग्रेसने मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.
मणिपूरमध्ये लोक अजूनही मरत आहेत. आणि आपले हिंदुस्थानचे पंतप्रधान कुठे आहेत?…. तर तुम्ही स्वतःच बघा असे म्हणत एक्स अकाऊंटवरून नरेंद्र मोदी यांचा समुद्र किनाऱ्यावर खुर्चीत बसून समुद्र न्याहाळताना आणि समुद्रकिनारी फेरफटका मारतानाचे तसेच स्नार्कलींग करतानाचे पह्टो शेअर केले आहेत. वेगवेगळ्या ड्रेसमध्ये पह्टो काढले जात आहेत. मस्त पोज देऊन पह्टो काढले जात आहेत. कधी समुद्राच्या लाटांसोबत खेळताना तर कधी समुद्रकिनारी निवांत खुर्चीत बसताना पह्टो काढले जात आहेत, अशा शब्दांत काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे.
मोदींकडे जबाबदाऱ्यांपासून पळ काढण्याची कला
देशात अनेक प्रश्न आहेत. मणिपूरसह अनेक समस्या आहेत. पण, मोदी तिकडे कधीही गेले नाहीत. ते लक्षद्वीपमध्ये समुद्र किनारी जाऊन मौजमजा करत आहेत. ते आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढण्यात माहीर आहेत. त्यांच्याकडे ती कला आहे, अशी टीकाही काँग्रेसने एक्स अकाऊंटवरून केली आहे.