![election-commission](https://www.saamana.com/wp-content/uploads/2017/10/Election-commission-696x447.jpg)
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती पुढील आठवड्याच्या सुरुवातीला नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी बेठक घेण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्याच्या सुरुवातीला ही बैठक होण्याची शक्यता आहे. अंतिम करण्यासाठी बैठक घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीतील समितीमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पंतप्रधानांनी नियुक्त केलेले केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतील. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत असल्याने समितीची बैठक रविवारी किंवा सोमवारी होऊ शकते. ही समिती एका नावाची शिफारस करेल. यानंतर राष्ट्रपती शिफारसीनुसार पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतील.
राजीव कुमार यांची मे 2022 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने 2024 मध्ये लोकसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या. याशिवाय एका दशकाहून अधिक काळानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या.लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि दिल्लीत विधानसभा निवडणुका झाल्या. 2023 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या देखरेखीखाली कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये निवडणुका झाल्या होत्या.राजीव कुमार यांच्यानंतर ज्ञानेश कुमार हे सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्त आहेत. त्यांचा कार्यकाळ 25 जानेवारी 2029 पर्यंत आहे. सुखबीर सिंग संधू हे दुसरे निवडणूक आयुक्त आहेत.
आतापर्यंत फक्त सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्तांनाच मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून बढती दिली जात होती. तथापि, गेल्या वर्षी मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्यांवर एक नवीन कायदा लागू झाला. याअंतर्गत, एका समितीने या पदांवर नियुक्तीसाठी पाच सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची नावे निवडली होती जेणेकरून पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समिती त्यांचा विचार करू शकेल.