संयुक्त महाराष्ट्राच्या देदिप्यमान संघर्षामुळे मुंबई गुजरातला मिळाली नाही. त्याचा बदला म्हणून आता मुंबई क महाराष्ट्रातून अनेक उद्योग गुजरातला स्थलांतरित केले जात आहेत. महानंदचे हस्तांतरण याच साखळीची पुढची कडी म्हणून गुजरातला आंदण दिले जात आहे असा आरोप अखिल भारतीय किसान सभेने केला आहे. महानंद डेअरी राष्ट्रीय दुग्धकिकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात किसान सभा आक्रमक झाली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाला किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे.पी. गावित, उमेश देशमुख, चंद्रकात गोरखाना, सुभाष चौधरी, संजय ठाकूर, डाँ. अजित नवले यांनी कडाडून किरोध केला आहे.