‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका

म्युच्युअल फंड सही है’ असा दावा करणाऱया जाहिरातींवर कारवाई व्हावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. जाहिरातींसाठी ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया’ला दिलेली परवानगी रद्द करण्याबाबत सेबीला निर्देश देण्याची विनंती याचिकेतून केली आहे.

चार्टर्ड अकाऊंटंट चंद्रकांत शाह यांनी ही याचिका केली आहे. सेबीने नागरिकांना गुंतवणुकीचे महत्त्व पटवून देण्याचे काम ’असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया’वर सोपवली आहे. मात्र ही संघटना जबाबदारी योग्यप्रकारे निभावत नसल्याचे दिसतेय. संघटनेमार्फत केल्या जाणाऱया ‘म्युच्युअल फंड सही है’ यांसारख्या जाहिराती दिशाभूल करणाऱया आहेत, असा दावा याचिकेत केला आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने याचिकेवर सेबी व असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाला नोटीस बजावली आहे.