
देशात लवकरच टोलसाठी एक नवीन धोरण लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुढच्या 10-15 दिवसात हे धोरण लागू होईल. काही दिवसांत संपूर्ण देशभरातील सर्व टोल प्लाझा हटवले जातील असे गडकरी म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, देशभरातील सर्व टोल नाके हटवले जातील. याबाबत गडकरी यांनी फार काही सांगण्यास नकार दिला. परंतु पुढील 10 ते 15 दिवसांत देशात नवीन टोल धोरण लागू होईल अशी माहिती दिली.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार गडकरी म्हणाले की नवीन यंत्रणा लागू झाल्यानंतर सॅटेलाईट ट्रॅकिंगनुसार आपोआप टोल कापला जाईल. सॅटेलाईट ट्रॅकिंगच्या माध्यमातून गाडीच्या क्रमांकाची ओळख पटवली जाईल, त्यानंतर हा टोल आपोआप कट होईल असे गडकरी म्हणाले.