Photo – उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवराय संचलनाचा शुभारंभ

मुंबईतील फोर्ट येथे स्थानिय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित शिवराय संचलनाचा शुभारंभ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या. संचलनाची परंपरा गेली 49 वर्षे सुरू असून अधिक उत्साहाने दरवर्षी शिवप्रेमी या संचलनात सहभागी होतात. हा उत्साह सदैव टिकून रहावा आणि शिवछत्रपतींचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा, असे मत यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.