Photo : विजयानंतर टीम इंडियाचे जोरदार सेलिब्रेशन, खेळाडू झाले भावूक

राक्षसी फटकेबाजी करणाऱ्या क्लासनची पंडय़ाने काढलेली विकेट… 24 चेंडूंत 26 धावांची गरज असताना जसप्रीत बुमरा-अर्शदीप सिंहचा सर्जिकल स्ट्राईक आणि शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने टिपलेल्या अद्भुत झेलाने हातून निसटलेला टी-20 वर्ल्डकप हिंदुस्थानी संघाला जिंकून दिला. त्याचबरोबर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपला 17 वर्षांचा टी-20 जगज्जेतेपदाचा दुष्काळ संपवला आणि चौथ्या जगज्जेतेपदावर टीम इंडियाने शिक्कामोर्तब केले.