Photo : पाण्यासाठी पुणेकरांची वणवण, ‘स्मार्ट’ पुण्यातील हेच का अच्छे दिन?

पुण्याला स्मार्ट सिटी म्हटले जाते. पण, याच स्मार्ट सिटीत पुणेकरांना पाण्यासाठी बारा वाटा कराव्या लागत आहेत. कुणी हातातून हंडा घेऊन, तर कुणी मोटारीतून, दुचाकीवरून पाण्याचे कॅन घेऊन घरी जातानाचे हे चित्र कोणत्या दुर्गम भागातले नव्हे, तर हे आपल्या दत्तनगर चौक, आंबेगावमधील आहे. त्यामुळे हेच का स्मार्ट सिटीतील अच्छे दिन? असा सवाल नागरिक करीत आहेत. (फोटो: चंद्रकांत पालकर)