Photo – हळद की होळी… पाहा सिंधूंची ‘कलरफूल’ हळद

हिंदुस्थानातील कोट्यवधी क्रीडाप्रेमींची आवडती बॅडमिंटनपटू असलेली पी.व्ही. सिंधू 22 डिसेंबर रोजी हैदराबादस्थित उद्योगपती वेंकट दत्ता साईशी विवाहबंधनात अडकली. त्यांचा विवाहसोहळा उदयपूर येथील एका महालात राजेशाही थाटात पार पडला. या विवाहसोहळ्याचे शाही फोटोज समोर आल्यानंतर आता सिंधूंने हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र या हळदीत फक्त पिवळा रंग नसून अक्षरश: होळी खेळत असल्याप्रमाणे सर्व रंगाची उधळण झाली आहे.