पावसाळा सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. डोंगर दऱ्यांमधून वाहणारे झरे, पावसामुळे झालेले अल्हादायक वातावरण, मंद धुंद करणारा मातीचा सुगंध, सर्वत्र पसरलेली हिरवळ पाहून मन आनंदून जातं. असंच काहीसं वातावरण सध्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरानमध्ये झालं आहे. पाहा तिथले हे मनाला आनंद देणारे फोटो…
(सर्व फोटो – महाराष्ट्र टुरिझ्म X अकाऊंट)