
टीम इंडियाच्या महिला संघातील क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्ज हिने तिच्या इंस्टाग्रामवर साडीतले फोटो शेअर केले आहेत. या सोबत तिने ”महाराष्ट्रात राहतेय आणि साडी नेसलीय. लय भारी वाटतंय”, अशी कॅप्शन दिली आहे. तिने ही साडी शिव छत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार सोहळ्यासाठी नेसली होती.