![deepika 1 (1)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/deepika-1-1-696x447.jpg)
अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने 8 सप्टेंबरला कन्यारत्नाला जन्म दिला. तेव्हापासून मॅटर्निटी लिव्हवर असलेली दीपिका आता हळूहळू पुन्हा कामावर परतू लागली आहे. दीपिकाने नुकतेच एका ब्रँडसाठी फोटोशूट केले असून त्यात ती कमालिची सुंदर दिसत आहे.
काळ्या रंगाचा लाँग गाऊन त्यावर डायमंड ज्वेलरी आणि डस्की लूक मेकअपमध्ये दीपिका उठून दिसत आहे.