Photo – ऑलिम्पिक स्पर्धेत तापसी पन्नूचे वेगवेगळे रंग

बॉलीवूड अभिनेत्री Taapsee Pannu कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. यंदाच तिने बॉयफ्रेंड मॅथियास बो सोबत लग्नगाठ बांधली. तापसी सध्या Paris Olympics 2024 मध्ये दिसली. यावेळी तिच्यासोबत तिचा पती मॅथियास बो आणि बहिण शगुन पन्नू देखील आहेत. यावेळी ती हिंदुस्थानी खेळाडू चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रेंकीरेड्डी या खेळाडूंचे प्रशिक्षक मॅथियास यांना पाठिंबा देण्याकरीता तापसी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पोहोचली. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या दोन दिवसांच्या या ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तापसीने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हिंदुस्थानी ध्वज फडकवताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

तापसीने या दोन दिवसांच्या ट्रीपमध्ये इंडो-वेस्टर्न पोशाख परिधान केला होता. पहिल्या दिवशी तिने मिंट रंगाच्या साडीवर पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला होता. त्यावर ऑक्सिडायझ्ड बांगडया आणि कानामध्ये सोन्याचे हूप होते. या फोटोसोबत तिने “Day 1 of endless walking, Walking Paris’ prettiest street (coz that’s what Mindy says!) to walking from group stage to knockout stage. Time to call it a day!” असे कॅप्शन दिले आहे.

दुसऱ्या दिवशीच्या फोटोमध्ये तिने धोती स्टाईलमध्ये लाल रंगाची साडी नेसली असून यावर काळ्या रंगाची स्पेगेटी घातली आहे. या दोन्ही साड्या सुता बॉम्बेच्या तॅप कलेक्शनमधील साड्या आहेत.