केरळमधील वायनाडमध्ये अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून आतापर्यंत 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या या भागात मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. चिखल दगड धोंड्यातून वाट काढत जवान बचावकार्यात गुंतले आहेत. य़ात काही महिला जवानांचा देखील समावेश आहे. वायनाडमध्ये अनेक रस्ते पूल वाहून गेले आहे. त्यामुळे लष्काराला तत्काळ एक पूल बांधावा लागला. अवघ्या एका दिवसात लष्कराने वायनाडमध्ये बेले ब्रिज बांधला असून या कार्याचे नेतृत्व एका महिला जवानाने केले.