
मुंबईच्या अनेक भागातील पाणीटंचाई आणि दूषित-गढूळ पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही पालिका कोणतीही कार्यवाही करीत नसल्यामुळे ढिम्म प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसैनिकांनी हंडा मोर्चा काढला.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)
दादर येथील शिवसेना भवनाजवळ माहीम विधानसभेचे शिवसेना आमदार महेश सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते.
माता-भगिनी डोक्यावर हंडा घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या.
यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड केली.
त्याचबरोबर “पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. मुंबईकरांच्या पाण्यासाठी लढू, प्रशासनाला जाब विचारू! अशा आशयाचे फलक घेऊन शिवसैनिक सहभागी झाले होते.