
शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने अभिनेता विकी कौशल याने रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. रायगडावरील फोटो स्वतः विकी कौशलने सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचे भाग्य मला लाभले. इथे येण्याची ही माझी पहिलीच वेळ होती आणि महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही, असे कॅप्शन देत विकी कौशल याने सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.