दादर येथील नियोजित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. लवकरच हे स्मारक पूर्ण होणार असून स्मारकाच्या कामाची उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला.