
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवनियुक्त शिवसेना सचिव सुधीर साळवी यांचे अभिनंदन केले. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, आमदार अजय चौधरी, उपनेत्या किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.