नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळे फुलून गेली आहेत. बुधवारी 1 जानेवारी पासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे 2024 या वर्षातील शेवटचा सूर्यास्त पाहून पर्यटकांनी सरत्या वर्षाला निरोप दिला.
31st चे औचित्य साधत पर्यटकांनी महाराष्ट्रातील सर्वच पर्यटन स्थळांना मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे.
कुटुंबासह वर्षाचा शेवटचा दिवस आनंदात घालवण्यासाठी कोकणातील जवळपास सर्वच सागर किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत.
वर्षाचा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली होती.
यावेळी मावळतीला जात असलेल्या सूर्यासोबत सरत्या वर्षाच्या चांगल्या आठवणींना उजाळा देत व वाईट आठवणींना पुसून टाकत सूर्य देवाला निरोप देण्यात आला.