शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोकसभा संसदीय कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते, संसदीय दल नेते, खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते लोकसभेचे गटनेते खासदार अरविंद सावंत ह्यांच्या हस्ते झाले. ह्यावेळी शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, उपनेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार संजय दिना पाटील, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार संजय देशमुख, खासदार नागेश पाटील आष्टीकर तसेच कर्मचारी उपस्थित होते.