Photo – संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात जन आक्रोश मोर्चा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या आणि सोमनाथ सुर्यवंशी याचा पोलीस कोठडीत संशयास्पद झालेला मृत्यू. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ पुण्याच “जन आक्रोश मोर्चा”चे आयोजन करण्यात आले होते.

सर्व फोटो – चंद्रकांत पालकर

संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुण्यामध्ये “जन आक्रोश मोर्चा” काढण्यात आला.

यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दाखवत सरकारच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला.

धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराडला फाशी द्या, गृहमंत्री साहेब बीड चा बिहार होऊन देणार का? अशा आशयाचे पोस्टर्स यावेळी नागरिकांनी झळकावले.

लाल महाल, फडके हौद, दारुवाला पुर, अपोलो थिएटर, के.इ.एम. हॉस्पिटल आणि समर्थ पोलीस स्टेशन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.