Photo – पुणे महानगरपालिकेचा अमृत महोत्सव, फळे आणि फुलांचे आकर्षक प्रदर्शन

पुणे महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त फळे आणि फुलांचे आकर्षक प्रदर्शन डेक्कन येथील जंगली महाराज रोडवरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात भरणार आहे. 

(सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)

विशेष म्हणजे यावर्षी नागरिकांना जंगल सफारी थीमचा आनंद घेता येणार आहे.

प्रतिकात्मक एकशिंगी गेंडा आणि झेब्रा, झिराफसह विविध प्राणी नागरिकांना पाहता येणार आहेत. 

प्रतिकात्मक स्वरुपात छोठे खेडेगाव निर्माण करण्यात आले असून या गावात बैलगाडी, मंदिर आणि गायी-वासरांची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. 

विविध फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आली असून त्यांना विविधा प्राणी-पक्षांच्या रुपात आकर्षकरित्या बनवण्यात आले आहे. 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाचे दर्शन सुद्धा नागरिकांना या दोन दिवसांमध्ये घेता येणार आहे.

नद्यांची होत असलेली दुरावस्था हा मोठा गंभीर प्रश्न सर्वच ठिकाणी आहे. त्याच अनुषंगाने जनजागृतीपर असे नदी सुधार मॉडेलही या प्रदर्शनामध्ये उभारण्यात आले आहे. 

महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीन सदर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शनिवार (15 फेब्रुवारी 2025) आणि रविवार (16 फेब्रुवारी 2025) असे दोन दिवस हे प्रदर्शन नागरिकांना पाहता येणार आहे.